मानेवाडीत दारू अड्ड्यावर छापा


स्थैर्य, मानेवाडी, सातारा, दि.१४: मानेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणार्‍या अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. याबाबत माहिती अशी, मानेवाडी गावच्या हद्दीत बसस्टॉपच्या आडोशाला रमेश पुंडलिक निंबाळकर रा. मंगळवार पेठ, बोगदा, सातारा हा अवैध दारू अड्डा चालवत होता. याची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देशी दारुच्या 2496 रुपयांच्या 48 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.

Previous Post Next Post