लक्ष्मी टेकडी परिसरात अवैध धंद्यांवर छापे

  


स्थैर्य, सातारा, दि. 11 : सातारा येथील लक्ष्मी टेकडी परिसरात शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री तसेच जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 1105 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी, लक्ष्मी टेकडी पसिरातील आशा संतोष शिवपालक ही महिला घराच्या आडोशाला अवैध दारू विक्री करत होती. सातारा शहर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून 572 रुपयांच्या 8 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. परंतु, संशयीत महिला तेथून पसार झाली.


दरम्यान, त्याच परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अरुण रामचंद्र माने याच्या जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी छापा टाकला. पोलिस आल्याचे पाहताच अरुण माने तेथून पसार झाला. या छाप्यात पोलिसांनी 633 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले.
Previous Post Next Post