राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

स्थैर्य, कोल्हापूर, दि.५: तीन आमदार आणि एक खासदारनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांनी घरीच उपचार सुरू केले आहेत.

जिल्ह्यात यापूर्वी खासदार संजय मंडलिक , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील आणि प्रकाश आवडे यांच्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेक अधिका-यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरोना चाचणी करून घेतली त्यामध्ये त्यांच्या फुप्फुसांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे त्यांनी घरातच उपचार सुरू केले आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya