औषधे, जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन कोरोनाग्रस्तांना दिलासा

 

आरोग्य सेविका वनिता भुजबळ व ग्रामस्थांच्याकडे आरोग्य साहित्य प्रदान करताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, खटाव तालुका सोशल फौंडेशनचे संस्थापक धनंजय क्षिरसागर व मान्यवर.(छाया :समीर तांबोळी )स्थैर्य, कातरखटाव, दि.२०: कोरोना संसर्गजन्य आजाराने आपले भयानक परिणाम दाखवण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत शहरी भागात असणारा आजार ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचला आहे. मानवतेच्या भावनेतून एकमेकांनासहकार्य करून या संकटावर मात करू असे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले. 
घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला ११ ऑक्सिजन मशीन प्रदान करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरांगे, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, डॉ बी जे काटकर, प्रा. अर्जुनराव खाडे, सी एम पाटील, अशोकराव गोडसे, नंदकुमार गोडसे, बाजार समिती सभापती शशिकांत देशमुख, तुकाराम यादव, सुनील गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष शोभा माळी, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे, आप्पासाहेबगोडसे, जयवंत पाटील, डॉ प्रशांत गोडसे, विपुल गोडसे, राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

घार्गे म्हणाले आजपर्यंत जनतेने दुष्काळी पाणी टंचाई ,भूकंप, वादळ, पूरस्थिती, आदी समस्या पहिल्या. याप्रसंगी चाराछावणी , टँकरने पाणी पुरवठा करून आपण वेगवेगळ्या अडचणींवर मात केली. यापेक्षा कोरोना महामारी अतिशय भयानक आहे. आजार संसर्गजन्य असल्यामुळे माणसे एकमेकांपासून दुरावली जात आहेत. असे न करता प्रत्येकाने एकमेकांना धीर देण्याचे काम केले पाहिजे. कोरोना संदर्भात केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपआपल्या परीने सहयोग द्यावा. या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा किशोरीताई पाटील, डॉ अशोकराव माने, नगरसेविका सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, संदीप गोडसे, अमोल वाघमारे, जयवंत गोडसे, ईश्वर जाधव, यशवंत घाडगे, नवनाथ वलेकर, डॉ शिवाजी कुंभार, डॉ संतोष मोरे, डॉ सम्राट भादुले आदी सह मान्यवर उपस्थित होते.


वडूज कोवीड केंद्रासाठीही खारीचा वाटा

विजय शिंदे मित्र मंडळातर्फे वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात होणार्‍या कोवीड केअर सेंटर, कातरखटाव प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य कर्मचार्‍यांना साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चव्हाण यांनी मदतीचा धनादेश स्विकारला. यावेळी सुनिल गोडसे, किशोरी पाटील, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, राजू कुंभार, दिपक बोडरे आदी उपस्थित होते. या खारीच्या वाट्याने मित्र मंडळाने पहिली देणगी देवून शुभारंभ केल्याबद्दल मुख्याधिकारी खांडेकर यांनी धन्यवाद दिले.