अमेरिकन डॉलरमध्ये सुधारणेने सोने व कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबावस्थैर्य, मुंबई, ८ : अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोने व कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या. तसेच बेस मेटलमधील नफाही मर्यादित राहिला. तथापि, कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पॉट गोल्ड किंमतीतील घसरणीवर मर्यादा आल्या. सातत्याने होत राहिलेल्या आर्थिक घसरणीमुळे गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याकडे वळले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.१९% नी घसरून १९२८,८ डॉलर प्रति टनांवर पोहोचले. मात्र कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने तत्काळ आर्थिक सुधारणा होण्याच्या आशाही कमी होत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरातील नुकसान मर्यादित राहिेले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने पुढील महिन्यात कमी व्याजदराचे वातावरण आणि प्रोत्साहनपर उपाययोजना वाढवल्याने पिवळ्या धातूंना आणखी आधार मिळण्याचे संकेत मिळाले. युरोचे मूल्य वाढीसंदर्भात या आठवड्यानंतर ईसीबी चलनविषयक पॉलिसीकडे गुंतवणूकदार सकारात्मक दृष्टीने पाहतील.


कोरोना विषाणूच्या रुग्णात नियमित वाढ होत असल्याने उद्भवलेल्या आर्थिक मंदीपासून जागतिक तेल बाजारही संघर्ष करत आहे. तसेच सौदी अरेबिया या कच्च्या तेलाच्या सर्वात मोठ्या निर्यातदाराने आशियाई देशात ऑक्टोबर २०२० मध्ये अधिकृत विक्री किंमत कमी केल्याने तेलाच्या किंमती आणखीच घसरल्या. मागणीतील घट लक्षात घेता, निर्यातदाराने हा निर्णय घेतला. कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा होत असल्याने अमेरिकी कंपन्यांनी नवीन तेल पुरवठ्यात वाढ केली. त्यामुळे तरल सोन्याच्या किंमतीही घसरल्या. एकूणच, डॉलरमध्ये सुधारणा, घटती जागतिक मागणी आणि आर्थिक वृद्धीतील मंदी यामुळे कच्च्या तेलाच्या दरात आणखी घट झाली. आजच्या व्यापारी सत्रात एमसीएक्सवर तेल आणखी घसरण्याची चिन्हे आहेत.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.