सुशांत प्रकरण:रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा केला दाखल; एम्समध्ये अभिनेत्याच्या व्हिसेराची चाचणी होणार, विष दिल्याची शंका; रियाची चौकशी सुरु


स्थैर्य, मुंबई, दि.७: रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांकाविरोधात बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रियाच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, 8 जून रोजी प्रियांकाने सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्यामध्ये एनडीपीएस कायद्याने बंदी घातलेल्या औषधांचा उल्लेख होता.

दुसरीकडे, एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत प्रकरणात विषप्रयोग करण्यात आला होता, याचा तपास करण्यासाठी व्हिसेरा टेस्ट करणार आहे. 10 दिवसांत याचा रिपोर्ट येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतला विष देण्यात आले होते, असा संशय मेडिकल टीमला आहे. याप्रकरणी मेडिकल बोर्डची पुढची मिटींग येत्या 17 सप्टेंबर रोजी होईल.

सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम आज सलग दुसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी विचारत आहे. अशी बातमी आहे की रियाचा भाऊ शोविक, सुशांतचे हाऊस मॅनेजर मिरांडा आणि हेल्पर दिपेश सावंत यांना समोर बसवून तिला प्रश्नोत्तरे केली जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, आज रियालाही अटक केली जाऊ शकते.

यापूर्वी रविवारी रियाची सहा तास चौकशी करण्यात आली. रिया उशीरा आल्याने प्रश्नोत्तरे पूर्ण होऊ शकली नाहीत, म्हणून आज पुन्हा तिला बोलावण्यात आले आहे. रिया रविवारी दुपारी 12 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya