एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतातील ‘तेजस्वी तारा’ निखळला – सांस्कृतिक कार्य मंत्रीअमित देशमुख

 

स्थैर्य, मुंबई दि.२५: हिंदीसह तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पार्श्वगायन करणारे ज्येष्ठ गायक श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतातील एक तेजस्वी तारा निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. 

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख शोकसंदेशात म्हणतात, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या एस. पी.बालसुब्रमण्यम यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपल्या गायकीने मोठा श्रोतावर्ग निर्माण केला. त्यांच्या आवाजाची वेगळीच जादू प्रेक्षकांनी आणि रसिकांनी चित्रपटांमधून, वेगवेगळया लाईव्ह कॉन्सर्टमधून वेळोवेळी अनुभवली आहे. अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या या ज्येष्ठ गायकाच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya