देशमुखांच्या तंटा मुक्तीने 80 वर्षाच्या वृध्दाचे मनस्वी समाधानस्थैर्य, कातरखटाव, दि. ०३ (प्रतिनिधी) : प्रशासनामध्ये एखाद्या अधिकारी, कर्मचार्‍याने चाकोरीबाहेर जावून झोकून देवून काम केल्यास सर्वसामान्य नागरीकांना त्याचा चांगला फायदा मिळतो. असाच एक सुखद अनुभव डाळमोडी (ता. खटाव) येथील सुमारे 80 वर्षाच्या वृध्द नागरीकाला आला आहे. वडूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मालोजी देशमुख यांनी केलेल्या तंटामुक्तीमुळे या वृध्दाचे मनस्वी समाधान झाले.


याबाबत अधिक माहिती अशी, डाळमोडी (ता.खटाव ) येथील सुतार समाजातील एक युवक व भावकीतील एका महिलेचे किरकोळ कारणावरुन भांडन झाले. या भांडनात महिलेस शिवीगाळ, दमदाटी झाली होती. त्या महिलेबरोबर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी सुहास उत्तम सुतार  गेले होते. या संशयित युवकास पोलीस ठाण्यात बोलवून बीट अम्मलदारांनी प्रकरण रफादफा केले. मात्र तक्रारदार महिलेबरोबर पोलीस ठाण्यात गेल्याच्या कारणावरुन चिडून जावून त्या युवकाने  सुतार यांच्या शेतात जाणारा रस्ता बंद करण्या बरोबरच दमदाटी, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुहास यांचे 80 वर्षीय वडील उत्तम पांडुरंग सुतार यांना सहन न झाल्याने त्यांनी वडूज पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे साधा तक्रारी अर्ज दिला. मात्र बारनिशीतील दफ्तर दिरंगाई, कोरोना प्रार्दुभाव या पाश्वभूमीवर आपल्या अर्जाचे नक्की काय झाले याचा उलगडा दीड महिने झालाच नाही. त्यानंतर  सुतार यांनी पोलीस उपनिरीक्षक  देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी वृध्दाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्याचबरोबर एवढा किरकोळ विषय असतानासुध्दा स्वत: देशमुख यांनी डाळमोडी येथील शिवारात जावून स्थळपाहणी केली. वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर ज्याच्या विरोधात तक्रार होती त्या युवकासह आजुबाजूच्या इतर तीन शेतकर्‍यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्या ठिकाणी यापुढच्या काळात कोणीही कोणाचा रस्ता अडवणूक करणार नाही. असे प्रतिज्ञापत्र तहसिलदारांसमोर लिहून घेतले.महिनाभराच्या मानसिक त्रासाने वृध्दास शारीरिक थकवाही चांगलाच जाणवत होता. मात्र  देशमुख यांनी योग्य रितीने तंटामुक्ती केल्याने उत्तमराव सुतार यांचा मानसिक त्रास कमी होण्याबरोबर इंजेक्शन गोळ्याशिवाय शारीरिक थकवाही 50 टक्के कमी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.