साताऱ्यात डोंगर परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ

 


शिवराज पेट्रोल परिसरतील डोंगरात आढळला पुरूषाचा मृतदेह 


स्थैर्य, सातारा, दि. ०२ : जावलीतील मार्ली घाट या ठिकाणी आढळलेल्या मृतदेहांनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मार्ली घाटात संपूर्ण कुटुंबच संपवल्याची घटना ताजी असतानाच सातारा तालुक्यातील शिवराज पेट्रोल परिसरातही आज एक पुरूषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा शहरा लगत शिवराज पेट्रोल परिसरातील डोंगरात बुधवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 आहे. अंगात निळी पँट, शर्ट आहे.


दरम्यान, मार्ली घाटातही अशाच प्रकारे सुरूवातील एक त्यानंतर काही दिवसांनी एक आणि संशयित ताब्यात घेतल्यानंतर दोन असे मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर हे खून पैशाच्या अमिषातून झाले असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच शिवराज पेट्रोल परिसरातील डोंगरात सापडलेल्या पुरूषाचा मृतदेहामुळे परिसरातील खळबळ उडाली आहे. ‘माली घाट’ प्रमाणे याही ठिकाणी धक्कादायक प्रकार झाला नसेल ना? याबाबत परिसरात तर्क-विर्तक लढवले जात आहेत.


पोलिस शिवराजे परिसरातील डोंगरात घटनास्थळी कसून तपास करत असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळल्याने त्याबाबत घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण समजू शकणार आहे.




Previous Post Next Post