शिवसेनेचा विजय:विधान परिषद उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी, डॉ. नीलम गोऱ्हेंची दुस-यांदा बिनविरोध निवड, तर भाजपचा पराभव

 

स्थैर्य, मुंबई, दि.८: विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक नुकतीच पार पडली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा उपसभापतीपदी निवड झाली आहे.

सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र याच काळात विरोधकांनी सभात्याग केल्याने नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड झाली.
Previous Post Next Post