वावरहिरे ते दानवलेवाडी धोकादायक वळणाला झुडपांचा विळाखा

 

स्थैर्य, वावरहिरे, दि.२०: वावरहिरे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासुन शंभरमीटर अंतरावर दानवलेवाडीकडे जाणार्‍या धोकादायक वळणावर रस्त्यांच्या कडेला साईट पट्ट्यावर झाडाझुडपांचा विळखा तयार झाला असुन रस्ता अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.वाढलेल्या काटेरी झुडपांनी साईट पट्ट्यावर आक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला.वाहन चालकांना या काटेरी फांद्या डोळ्याला व अंगाला लागुन इजा होण्याची भिती आहे.या रस्त्यावर एकाचवेळी समोरासमोर दोन वाहने आल्यास काटेरी झुडपे व गवत असल्याने साईट देता येत नाही परिणामी वाहन चालकामध्ये वादावादी चे प्रसंग घडत अाहेत. या ठिकाणी पुढील वाहन दिसत नाही.त्यामुळे या ठिकाणी अचानक वाहन समोर येवुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासंबधी सरपंच व ग्रामपंचायत याच्यांशी वारंवार बोलुन देखील उपाययोजना होत नाही.सदर रस्ता रहदारिचा असल्याने या ठिकाणी भविष्यात कोणतीही दुर्घटना घडु नये .याआदिच ग्रामपंचायत प्रशासनाने सावध होवुन रस्त्यावर वाढलेले काटेरी झुडपे तातडीने काढुन रस्ता मोकळा करावा अशी मागणी परिसरातील वाहनचालक व ग्रामस्थांकडुन होत आहे.