कोडोलीतून बहीण-भावाचे अपहरण

 


स्थैर्य, सातारा, दि. ०९ : येथील कोडोली परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील अल्पवयीन बहीण-भावाचे अपहरण करण्यात आले आहे. याबाबत संबंधित मुलांच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहरण झालेल्यांमध्ये 16 वर्षाची मुलगी व 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. ते आपल्या आईसह श्रीकृष्ण कॉलनी येथे राहत होते. मंगळवारी त्यांची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. यावेळी भाऊ-बहीण घरीच होते. रात्री नऊच्या सुमारास आई घरी आली. तेंव्हा दोन्ही मुले घरात नव्हती. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. संबंधित बहीण-भावाचे नेमके कोणी अपहरण केले, याबाबत पोलीस कसून तपास करत असून रात्री उशिरापर्यंत संबंधित बहीण-भावाचा ठावठिकाणा पोलिसांना लागला नव्हता. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करत आहेत.


जाधववाडीत सर्पदंशाने शेतकर्‍याचा मृत्यू

स्थैर्य, सातारा : जाधववाडी पो. तासगाव येथील जयसिंग मुगुटराव केंजळे (वय 49) यांना जनावरांच्या परड्यात सर्पदंश झाला. त्यांना बेशुद्धअवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.


मारहाणप्रकरणी गुन्हा

स्थैर्य, सातारा : गुरांच्या गोठ्यातील मलमूत्र हे दुकानासमोर येत असल्याचे सांगितल्याच्या कारणावरून पाचजणांना बेदम मारहाण केल्याची घटना कळंबे, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात भाऊसाहेब भरत इंदलकर, राधिका इंदलकर, भरत इंदलकर, विनोद आणि माया इंदलकर, सुधा इंदलकर, मनोज इंदलकर अशा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भिमराव जगन्नाथ कणसे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.Previous Post Next Post