…तर कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हानस्थैर्य, मुंबई, दि. ०८ : अभिनेत्री कंगना राणावतबाबत अभिनेते शेखर सुमन यांचे पुत्र अध्ययन सुमन यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे. "कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि तिने मलाही ड्रग्ज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला," असा आरोप अध्ययन सुमननं डीएनए वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.


शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी माहिती दिली की, कंगनाबाबतच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल.


त्यावर "मी माझी ड्रग्ज टेस्ट करून द्यायला तयार आहे, माझ्या रक्तात त्याचे नमुने आढळले किंवा माझा ड्रग्ज विक्रेत्यांशी काही संबंध आढळला तर मी माझी चूकी मान्य करेल आणि मुंबई कायमची सोडून जाईल," असं ट्वीट कंकना रणावतने केलं आहे.


अनिल देशमुख यांनी सांगितलं, "आमदार सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाई यांनी अभिनेत्री कंगना राणावतबाबत तक्रार दिलीय की, शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यांनी DNA वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, कंगना राणावत ड्रग्ज घेते आणि मला सुद्धा ड्रग्ज देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. याबाबत आमची अनेकदा भांडणं सुद्धा झाली. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याची प्रत आणि व्हीडिओ क्लिप आमदारांनी माझ्याकडे सुपूर्द केलीय. या प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल."


प्रताप सरनाईक यांनी याआधीही कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कंगनानं ज्यावेळी मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली, त्यावेळी आमदार सरनाईक यांनी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.


Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.