काही सॅनिटायझरमध्ये होतोय टॉक्सिक मेथानॉलचा वापर; दृष्टी जाण्याचा धोका

 


स्थैर्य, मुंबई, दि. 2: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत हात धुण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. मात्र कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियानं (सीजीएसआय) केलेल्या अभ्यासातून काही सॅनिटायझर शरीरासाठी हानीकारक असल्याचं आढळून आलं आहे. १२२ पैकी ५ सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळून आलं आहे. तर ४५ सॅनिटायझरमधील केमिकल आणि त्याच सॅनिटायझरच्या बाटल्यांवरील माहिती यांची जुळलेली नाही.

सीजीएसआयनं १२२ सॅनिटायझरमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्सची तपासणी केली. त्यातल्या ४ टक्के सॅनिटाझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळून आलं. यामुळे डोळ्यांना धोका पोहोचू शकतो आणि दृष्टीही जाऊ शकते. ३१ ऑगस्टला सीजीएसआयनं आपला अहवाल प्रसिद्ध केला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या सॅनिटायझरमधील घटकांची तपासणी करून सीजीएसआयनं अहवाल सादर केला. सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपन्या त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती लेबलवर देतात. ती माहिती आणि प्रत्यक्षात सॅनिटायझरमधील घटक जुळतात, याची तपासणी सीजीएसआयनं केली.

राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत ऑगस्ट २०२० मध्ये गॅस क्रोमॅटोग्राफीच्या माध्यमातून सीजीएसआयनं सॅनिटायझरचे नमुने तपासले.सध्या अनेक दुकानं आणि केमिस्टमधून सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सॅनिटायझरची मागणी वाढल्यानं अनेक नवे उत्पादक सॅनिटायझरची निर्मिती करत आहेत. त्यांच्याकडून दर्जा राखला जात नाही. उत्पादक भेसळ करत असल्यानं ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,असं सीजीएसआयनं अहवालात म्हटलं आहे.चिंताजनक!कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना हँड सॅनिटायझर ओव्हर द काऊंटर उत्पादन असून त्याच्या दर्जा अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासला जातो.सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉलचा वापर करण्यास मनाई आहे. कारण टॉक्सिक मेथानॉलवर बंदी आहे. मात्र काही उत्पादक टॉक्सिक मेथानॉलचा सॅनिटायझरमध्ये वापर करतात. ते ग्राहकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं,असं सीजीएसआयनं अहवालात नमूद केलं आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.