मुद्रांक विक्रेते, लेखनिक आजपासून 8 दिवस कामकाज बंद ठेवणारस्थैर्य, सातारा, दि. 9 : कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदनही मुद्रांक जिल्हाधिकारी खांडेकर यांना देण्यात आले आहे. 


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनीक यांचे प्रकारच्या कामासाठी जनतेशी प्रत्यक्ष संपर्क येत असतो. परंतु, सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. नुकताच कोरोनामुळे पाटण येथील व्यवसायिक बंधु देवकांत यादव यांचा मृत्यू झाला. तसेच कराड येथील सहकारी प्रकाश देखमुख यांचेदेखील निधन झालेले आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्वजण मुद्रांक विक्रेते व दस्तऐेवज लेखनीक कामे सामाजिक बांधीलकी म्हणून दि. 10 ते 18 सप्टेंबरपर्यंत कामकाज बंद ठेवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 


जनता व सरकार यामधील महत्वाचा दुवा असलेले मुद्रांक विक्रेते व लेखनिक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसुल शासन दरबारी जमा होते. त्या अनुषंगाने मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांनाही कोविड सुरक्षा विमा कवच व अन्य सुविधा शासनाकडून मिळाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.Previous Post Next Post