राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

 

स्थैर्य, मुंबई, दि.४: राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. केदार यांचा कोरोना अहवाल (दि. ३) रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 

सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटत असल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी केली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच उपचारासाठी दाखल झाले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

केदार यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी व पावसामुळे नुकसान झालेल्यांची पाहणी करतेवेळी अनेक अधिकारी त्यांच्या सोबत असल्यामुळे नागपूर येथील कर्मचाऱ्यांनाही खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली आहे.
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.