कलाकारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्य शाशन कटिबद्ध : सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख; कलाकार मंडळींनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची भेट

 

स्थैर्य, सातारा, दि.२४ : पुनःश्च हरिओम करताना येणार्‍या विविध अडचणींवर राज्य शासनाचे आवश्यक ते सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच यापुढे हि काही कायम स्वरूपी उपाय योजना राज्य शाशनाने कराव्यात. असे व अनेक प्रश्न घेऊन कलाकार मंडळींचे शिष्ठमंडळ नुकतेच सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची भेट घेतली. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांची प्रशांत दामले, दिलीप जाधव, चंद्रकांत लोकरे, वैजयंती आपटे, अमेय खोपकर यांनी नाटक आणि करमणूक क्षेत्रातील सद्य परिस्थिती वर सविस्तर चर्चा केली. कलाकारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्य शाशन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी या वेळी दिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya