कांदा निर्यातबंदी उठवा - कृषी पदवीधर युवाशक्तीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

स्थैर्य, नागठाणे, दि.२०: केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या कांदा निर्यातबंदी धोरणाच्या निषेधार्थ नागठाणे (ता. सातारा) येथील कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे व जिल्हाध्यक्ष रोहन विभुते यांनी सातारा उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग व साताराचे नायब तहसिलदार सुनील मुनाळे यांना निवेदन दिले. 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी हा देशाचा तारणहार असून सध्या तो आर्थिक अडचणीत असताना कांदा निर्यात बंदी सारखा निर्णय हा अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे देशाचेही तितकेच नुकसान आहे. याच शेती क्षेत्राने लॉकडाऊनच्या काळात देशाच्या विकासात मोलाची कामगिरी केली होती. सध्या कांद्याला चांगलं भाव मिळणार असल्यामुळे शेतकरी आनंदित होता. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचा दर पुन्हा पडणार आहे. केंद्र सरकारने बंदी उठवावी व देशाचे नुकसान टाळावे. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रोहित जाधव, शुभम दळवी, वैष्णव कदम विनय तावरे व आप्पा लाड उपस्थित होते.