मोळाचा ओढा येथून दुचाकी चोरीस

 


स्थैर्य, सातारा, दि.२०: मोळाचा ओढा येथील चिकन सेंटरसमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत रियाज कादर सय्यद यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोळाचा ओढा येथील ए-वन चिकन सेंटरच्या समोर त्यांनी दुचाकी पार्क केली होती. दि. 16 रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास चोरट्याने गाडी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार चव्हाण तपास करत आहेत.