तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत  शेवरी प्राथमिक  शाळेच्या कु.सिद्धी हिरवेचे  यश

 

स्थैर्य, माण, दि.२८: शाळा बंद शिक्षण सुरू माझे आवडते शिक्षक याविषयावर आधारित झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरीचा तालुक्यात प्रथम क्रमांक येऊन जिल्हास्तरावर निवड झाली.

सातारा जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने एकत्रितपणे ५ सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्त Thanks A Teacher या अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदने कोवीड काळात प्रभावी शिक्षण चालू आहे. पंचायत समिती माणच्या शिक्षण विभागाने त्याअनुषंगाने घेतलेल्या स्पर्धेत इयत्ता-६वी तील कु.सिद्धी अमोल हिरवे हिने शाळा बंद शिक्षण सुरू  यावर आधारित माझे आवडते शिक्षक या विषयावर online वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन माण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.... तिच्या भाषणातून कोवीड काळातही आमचं शाळा बंद असुनही नियमित शिक्षण सुरू आहे.कोरोना काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम ,यापूर्वीचे शालेय स्पर्धात्मक यश, मला भावलेले माझे शिक्षक, कोरोना कालावधीत उत्कृष्टरित्या शालेय शिक्षण सुरू असून याबद्दलही वस्तूस्थितीदर्शक शैक्षणिक वातावरण याविषयीही माहिती दिली. सदर स्पर्धेसाठी तिला श्री. आकाराम ओंबासे यांचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. सातारा जिल्हास्तरीय online वक्तृत्व स्पर्धेतही तिने उत्कृष्ट वक्तृत्वाने उपस्थित मान्यवरांची शाबासकी मिळवली. तिच्या या यशाबद्दल माण पंचायत समिती सभापती सौ.कविता जगदाळे उपसभापती श्री.तानाजी कट्टे सर्व पंचायत समिती सदस्य ,गटविकासअधिकारी श्री.भरत चौगुले, गटशिक्षणअधिकारी सौ.सोनाली विभूते, शिक्षणविस्तारअधिकारी श्रीमती संगिता गायकवाड ,केंद्रप्रमुख श्री.अंकुश शिंदे, मा.सरपंच संतोष सिंदकर ,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन हिरवे व उपाध्यक्ष नवनाथ माळवदे व सर्व सदस्य , शेवरी ग्रामस्थ ,मुख्याध्यापक तसेच सर्व पालक,शिक्षक बंधू भगिनीं,आदिंनी तिचे , अभिनंदन केले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya