पेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 स्थैर्य, सातारा, दि.२६: मोती चौकातील प्रसिद्ध लाटकर बंधू पेढेवाले शरद लाटकर यांचे चिरंजीव आकाश लाटकर ( वय -३१ ) यांनी शनिवारी पहाटे यादो गोपाळ पेठेतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . मात्र आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही .

शाहूपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे . लाटकर कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक गोपाळ हांडा यांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली . लाटकरांचे यादो गोपाळ पेठेत दुमजली घर आहे . नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री लाटकर कुटुंबीय झोपावयास गेले . आकाशही त्याच्या खोलीत गेला होता मात्र शनिवारी सकाळी तो पंख्याला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला . आकाश हा सप्तता रा सांस्कृतिक मंडळ मित्र समूहाचा सभासद होता . शाहूपुरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .लाटकर बंधू पेढे वाले यांच्या पोवई नाक्यावरील दुकानाची जवाबदारी आकाश सांभाळत होता .आकाशने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे समोर आले नाही . हवालदार कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे .आकाश याच्या आकस्मिक मृत्यूने लाटकर कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला आहे .
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya