सुशांत मृत्यू प्रकरण : सुशांतची कट रचून हत्या केल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत ; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४: भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला आहे की, सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार्‍या तीन मोठ्या एजन्सींना सुशांतची हत्या कट रचून केल्याचे पुरावे मिळाले आहेत आणि यातून न्यायालयात हत्या झाल्याचे सिद्ध करता येईल. हा दावा त्यांनी सीबीआय, ईडी (अंमलबजावनी संचनालय) आणि एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो)कडून करण्यात आलेल्या तपासाच्या आधारावर केला आहे. शनिवारी केलेल्या आपल्या दोन ट्वीटमध्ये सुशांतला न्याय मिळेल असा विश्वास दिला आहे.

सीबीआय घेऊ शकते निर्णय

आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये स्वामी यांनी लिहीले, "सुशांत सिंह राजपूतचे भक्त विचारत आहेत की, या प्रकरणाची सुनावणी कधी सुरू होईल. मी सांगू शकत नाही, कारण मृतदेह नसल्यामुळे एम्सची टीम तपास करू शकत नाही. त्यामुळेच हॉस्पीटलकडून मिळालेल्या रेकॉर्डच्या आधारे सांगता येईल की, हत्या झाली नाही. परंतू सीबीआय परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे निर्णय घेऊ शकते."

सुशांतला न्याय मिळेल

पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले, 'आता जेव्हा तीन एजन्सींनी मोठा खुलासा केला आहे, यामुळे सीबीआयला न्यायालयात सिद्ध करता येईल की, ही कट रचुन केलेली हत्या आहे. यातून सुशांतला नक्की न्याय मिळेल.'
Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.