बोरगाव येथे हॉटेलमधून टीव्ही चोरीस

 

स्थैर्य, नागठाणे, दि. १४: बोरगाव, ता. सातारा येथे हॉटेल रणवीर येथून 12 हजारांचा टीव्ही चोरट्यांनी लंपास केला. याबाबत नितीन हणमंत घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. दि. 12 रोजी सकाळी 10 ते 13 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल रणवीरचा पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला व 12 हजार किंमतीचा टीव्ही चोरून नेला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास एएसआय जाधव करत आहेत.

Previous Post Next Post