१ ऑक्टोबरपासून टीव्ही महागणार

 

स्थैर्य, दि.२२: १ ऑक्टोबरपासून सरकार ओपन सेल टेलिव्हिजनच्या आयातीवर ५ टक्के कस्टम ड्युटी लावणार आहे. त्यामुळे टीव्हीच्या किमती वाढू शकतात. ऑक्टोबरपासून टेलिव्हिजनच्या किमती वाढू शकतात. १ ऑक्टोबरपासून सरकार ओपन सेल टेलिव्हिजनच्या आयातीवर ५ टक्के कस्टम ड्युटी लावणार आहे. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

टेलिव्हिजन उद्योगावर आधीपासूनच दबाव आहे, कारण पूर्णपणे उत्पादित पॅनल्स (टीव्ही बनवण्याचा मुख्य घटक)च्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. खुल्या विक्रीवर सरकारने कस्टम ड्युटीवर एक वषार्ची सूट दिली होती. ३० सप्टेंबरला ती सवलत संपत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आयात शुल्कात सवलत वाढवून देण्याच्या बाजूने आहे.

आयात शुल्कात सवलतीमुळे टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगमधील गुंतवणूक वाढण्यास मदत झाली आहे आणि परिणामी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आता व्हिएतनाममधून आपला व्यवसाय व्यवसाय एकत्रित करून भारतात उत्पादन सुरू करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात वित्त मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya