वाई परिसरातील तिघेजण तडीपार

 


स्थैर्य, पांचगणी, दि. 5 : वाई परिसरात मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी करणार्‍या टोळीचा प्रमुख प्रशांत राजेंद्र कदम, (वय 23), रा. बावधन, ता. वाई, अनिकेत सुखदेव चव्हाण (वय 22), रा. बावधन व विजय विश्‍वास जाधव, (वय 21) (टोळी सदस्य), रा. सोनगिरवाडी, वाई, ता. वाई यांची टोळी तयार झाली होती. त्यांनी वाई परिसरात गर्दी, मारामारी करून, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी करणे असे गुन्हे केले आहेत. त्यांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हद्दपार प्राधिकरण तथा  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये सातारा, वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा, तालुका हद्दीतून 3 महिने कालावधी करता हद्दपार केल्याबाबत आदेश दिला आहे.


सदर टोळीतील इसमांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून वरील दोन्ही टोळीतील 3 इसमांना हद्दपार करण्याबाबत वाई पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर हद्दपार प्रस्तावांची सुनावणी होवून पोलीस अधीक्षक यांनी वरील प्रमाणे हद्दपार आदेश केले आहेत. या कारवाईचे विविध स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.


सातारा जिल्ह्यात अशाप्रकारे समाजामध्ये भीती, दहशत पसरविणार्‍या गुंडांचे व चोर्‍या, मारामारी, करणार्‍यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.Previous Post Next Post