फलटण मधील घरफोडी करणाऱ्या चोरांवर त्वरित कारवाई करा; बाबा प्रतिष्ठानची मागणी


स्थैर्य, फलटण : सध्या कोरोनाने फलटण शहरात व तालुक्यात थैमान घातलेले आहे. आधीच कोरोनाने केलेल्या लोकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यातच फलटण शहरात व तालुक्यात घरफोडी व भुरट्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. सध्य स्थितीत नागरिकांच्या मनात कोरोनाने भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यातच या भुत्या चोरांची पण भीती नागरिकांच्या मनात बसत आहे. तरी सदरील चोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बाबा प्रतिष्ठानने फलटण शहर पोलिसांकडे केलेली आहे.


फलटण शहर पोलिस स्टेशनला बाबा प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग राज्य संघटक ऍड. राजु भोसले, बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश नेरकर, उपाध्यक्ष संतोष भोईटे, सचिव प्रविण भोसले, सरचिटणीस जीवन वाघ, सहसचिव श्रीमंत निकाळजे यांनी केली.

Previous Post Next Post