एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने कातरखटाव करांची झोप उडाली

बाधितांच्या घराशेजारचा सील केलेला परिसर. (छाया : समीर तांबोळी)

 


उद्यापासून चार दिवसाचा कडक लॉक डाउन


स्थैर्य, कातरखटाव, दि. ३१ : गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या  एकाच कुटुंबातील  दहा जणांना काल कोरोना ची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे.


या बाबत अधिक माहीती अशी:गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी झालेल्या कातरखटाव गावात ऐन  बेंदुर  सनादिवशी पार राज्यातून आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली होती.  त्यानंतर आज अखेर एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र  दोन दिवसापुर्वी एकोनपन्नास वर्षीय पुरुष पॉजेटीव्ह सापडला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चौदा जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये  दहा जाणांचा रिपोर्ट पॉजेटीव्ह आला. यामध्ये एक वर्षाच्या लहान मुली सह तीन महीला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना  कोणतीही लक्षणे जाणवत  नसल्याने  घरीच कोरंटाईन करुण ठेवले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-याना  याची माहिती मिळताच परीसर सील केला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसुन चौकशी सुरु  आहे.


आरोग्य वर्धीनी केंद्राच्या  वैद्यकीय अधिकरी डॅा. वैशाली चव्हाण, डॅा. स्वप्नील वायदंडे, पोलीस पाटील घनशाम पोरे , आरोग्य कर्मचारी  साखळी तोडण्यासाठी प्रयत्न  करत असून मंगळवार (दि.१) पासून चार दिवसासाठी गावात कडक लॉक डाउन पाळण्याचा  निर्णय करोना कमेटीने जाहीर केला आहे.Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.