ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याने 10 लोकांचा मृत्यू, तर 11 जणांना वाचवण्यात यश

 


स्थैर्य, ठाणे / भिवंडी, दि.२१: ठाण्याजवळील भिवंडीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाला. सध्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनेनंतर स्थानिक लोकांनी 20 लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ही इमारत 30 वर्षे जुनी होती, आधीच धोकादायक घोषित केले होते. दोनदा नोटिसही बजावण्यात आली होती.

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
बब्बू(पु/२७वर्ष)
फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

सोमवारी पहाटे 3.40 वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये 21 कुटुंबे राहत होती. एनडीआरएफच्या पथकाने सोमवारी सकाळी ढिगाऱ्याखालून एक मुलाला सुखरुप बाहेर काढले. ठाण्याच्या आयुक्तालयाच्या पीआरओने 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. ही इमारत 1984 मध्ये बांधली असल्याचे म्हटले जात आहे.