रियाच्या अटकेनंतर सर्वात मोठी कारवाई मुंबई आणि गोव्यामध्ये ‘एनसीबी’ची छापेमारी

 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपास मोठ्या वेगाने सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये ५ ठिकाणी छापे टाकले आहेत. काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे.

छापेमारी झालेल्या ५ ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता. इतेंच नाही तर चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावे घेतली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झाली नसली तरी यातून मोठे रॅकेट समोर येणार असल्याचे दिसते आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या ५ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये एनसीबी पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

खरेतर, रियाच्या अटकेनंतर एनसीबीची सगळ्यात मोठी कारवाई आहे. यामध्ये बॉलिवूड आणि ड्रग्ज असा मोठा सापळा उघड होणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता रियाच्या चौकशीनंतर अनेक बॉलिवूड स्टार्स हे एनसीबीच्या रडारवर असणार आहेत. दरम्यान, या ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स विभागाला (एनसीबी) मोठा साक्षीदार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीचा घरी ड्रग्जचे कुरिअर पोहोचवणा-या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दीपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला त्याने ओळखले आहे.
Previous Post Next Post