लोणंद शहरात 8 दिवस बंद पाळण्यात येणार

 


स्थैर्य, लोणंद, दि. ११ : लोणंद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोणंदकरांनी गुरुवार, दि. 10 पासून स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या संपूर्ण लोणंद बंदला लोणंदकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. लोणंद शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. घराबाहेर न पडण्याचे आवाहन नगरपंचायत पदाधिकारी यांनी केले. लोणंद शहरात 8 दिवस बंद पाळण्यात येणार आहे.


लोणंद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळूून येऊ लागल्याने लोणंदकर नागरिक कोरोनाच्या प्रचंड दहशतीखाली आले होते. कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी कशी रोखता येईल यासाठी लोणंदकर ग्रामस्थ, पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक घेऊन लोणंद शहर 8 दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला पहिल्या दिवशी व्यापारी, नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  सकाळपासूनच लोणंद शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा ओस पडल्या होत्या. नागरिकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.


लोणंद शहरातील दुकाने बंद ठेवावीत व घरातून बाहेर पडू नये यासाठी नगराध्यक्ष सचिन शेळके, स.पो.नि. संतोष चौधरी, नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, हणमंत शेळके, हर्षवर्धन शेळके,  रमेश कर्नवर, शरद भंडलकर, मस्कू शेळके, शशिकांत जाधव, सुनील शहा, लक्ष्मण जाधव, वसंत पेटकर, भावेश दोशी, प्राजित परदेशी, दत्तात्रय नेवसे, रहमान सय्यद व शामराव केसकर यांनी शहरातून फेरी काढून आवाहन केले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya