भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

 

स्थैर्य, पुणे, दि.८: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रचे जनक मानले जाणारे प्रसिद्ध रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. स्वरूप यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. मागील दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.

स्वरूप यांनी अलाहाबाद येथून विज्ञानाची पदवी प्राप्त केली होती. तर १९५२मध्ये ऑस्ट्रेलियातल्या सी.एस.आय.आर.ओ. या संस्थेत खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. ऑस्ट्रेलियातल्या पॉल हिल येथे उभारलेल्या पॅराबोलीक अँटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली होती. तसेच उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली होती. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर पुण्याजवळील खोडद – नारायणगाव येथे जगातील दुस-या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले होते.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.