शिक्षकांच्या मागण्यांबाबत शाशन उदासीन; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक दिन काळा दिन म्हणून पाळला


स्थैर्य, फलटण : राज्य शासनाकडे शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत म्हणून शिक्षक दीना दिवशी सर्व शिक्षकांनी काळ्या फिती घालून काम केले. या बाबतचे सविस्तर निवेदन राज्याच्या शालेय शिक्षक मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत पाठवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे काळा दिन म्हणून शिक्षक दिन पाळण्यात आला. 


गेले अनेक दिवस शासन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी वेळ काढू पणाचे धोरण स्वीकारत आहे. या बाबत सविस्तर निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले.  निवेदन देताना वाघ, देशमुख, जंगम, बोबडे, काकडे, देशमुख व नाळे हे शिक्षक उपस्थित होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya