चीनच्या टिकटॉकची मालकी अमेरिकन कंपनीकडे येणार

 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.२२: अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकला चीनची व्हिडियो शेयरिंग अँप्स कंपनी बाइटडांसला विकत घेणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला मंजुरी दिली आहे. वॉलमार्टही या कराराचा एक भाग असेल अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. टेक्सासमध्ये या कंपनीचे ऑफिस असणार असून टिकटॉकची मालकी त्यामुळे अमेरिकेकडे येणार आहे.

हे प्रकरण अमेरिकन कोर्टातही गेले होत. अमेरिका आणि चीनमध्ये संबंध बिघडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्धाला सुरूवात झाली होती. अमेरिका चिनी मालांवर सूट देते मात्र चीन अमेरिकन कंपन्यांना सवलती देत नाही, असा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने वू चॅट आणि टिकटॉकवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. या कंपन्यांची मालकी अमेरिकन कंपन्याकडे आली नाही तर त्यावर बंदी घातली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. या अँप्समुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

या कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा चोरतात असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळेच भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे. जगभर या अँप्सचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून या कंपन्यांची हजारो कोटींची कमाई होत असते.

चीनच्या ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. चीन मधून आयात होणारे औषध सिप्रोफ्लोक्सासिनवर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे चिनी औषध कंपन्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. मेड इन चायना असे लिहिलेल्या औषधांवर हा कर लागणार आहे. औषध चीनमधून किंवा इतर देशांमधूनही आयात करण्यात आल्यावरही त्यांना अँडी डम्पिंग ड्युटी दयावी लागणार आहे.

देशातल्या काही कंपन्यांच्या तक्रारींच्या आधारे चौकशी करून हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर भारतातल्या कंपन्यांना नुकसान होत असल्याचे आढळून आले होते. २०१५-१६ मध्ये ११७ औषधांसाठीचा कच्चा माल आयात करण्यात आला होता. २०१८-२०१९ मध्ये त्याचे प्रमाण हे ३७७ टनांवर गेले होते.