प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला रोखू शकत नाही; सुपर कॉम्प्युटरचा दावा

 

स्थैर्य, दि.२३: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क, फेस कव्हर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, ग्लोव्हज अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जात आहे. अनेक लोक बाहेर पडताना आणि ऑफिसमध्ये काम करताना प्लास्टिक फेस शिल्डचा वापर करत आहेत. परंतु प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचे समोर आले आहे.

जपानी सुपर कॉम्प्युटरनुसार सध्या लोक कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक शिल्डचा चेह-यावर वापर करत आहेत. मात्र हे ऐरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेलं नाही. हे प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकत नसल्याचा, दावा करण्यात आला आहे.

जगातील सर्वात फास्ट कॉम्प्युटर फुगाकूने कोविड-१९ दरम्यान वापरण्यात येणा-या प्लास्टिक फेस शिल्डचं सिमुलेशन केलं आहे. ज्यात १०० टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स ५ मायक्रोमीटरहून लहान आढळले. जे प्लास्टिक विझार्ड्सद्वारेही वाचू शकतात. त्यामुळे पारदर्शी फेस शिल्डमधून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. एक मीटरच्या दहाव्या लाखाचा भाग मायक्रोमीटर असतो.

रिकेन सेंटर फॉर कॉम्प्युटर सायन्स येथे टीम प्रमुख असणारे मोटो त्सुबोकोरा यांनी सांगितलं की, फेस शिल्ड मास्कला पर्याय म्हणून पाहू नये. तसेच फेस मास्कच्या तुलनेत फेस शिल्ड अतिशय कमी प्रभावी आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya