अजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल

 

स्थैर्य, कातरखटाव, दि.२१: निमसोड -मायणी मार्गावरील मोराळे गावच्या हद्दीतील येरळा नदीवरील फरशी पूल पाण्याखाली गेले ने या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. प्रत्येक वर्षी या परीसरातील लोकांना पूलाच्या .भिषण समस्येला तोंड दयावे लागत असून गत वर्षी पाण्याचा अंदाज आल्याने एक वृद्ध वाहून गेले होते अजून किती जनांचे बळी गेलेवर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल मोराळेचे युवा सामाजिक कार्यकर्ते सुरजकुमार शिंदे यांनी दैनिक जनमत शी बोलताना व्यक्त केला.

शिंदे यांनी सांगितले की, मोराळे ( ता.खटाव ) येथील येरळा नदीवरील पुलाच्या .बांधकामाचे व शुभारंभाचे नारळ अनेकदा फुटले पण काम काय झाले नाही. निमसोड व मायणी ला जोडणाऱ्या हा रस्ता अत्यंत महत्वाचा मार्गावरन दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ असते.मायणी कडून सातारा कडे जाणारा हा जवलचा मार्ग आहे.मात्र या पूलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून संबधीतांनी लक्ष देत पूलाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya