राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत आहे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

स्थैर्य, सातारा, दि.२७: राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत आहे. 3 ऑक्टोबरच्या मराठा समाज बैठकीत ज्यांच्या कोणावर जबाबदारी येईल किंवा सर्वांच्यावतीने जे काही ठरेल त्यापध्दतीने आम्ही वाटचाल करू, असा विश्‍वास भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, मराठा समाजाचे प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे. नेतृत्व कोण करणार हा गौण विषय असल्याचे सांगत येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात होणार्‍या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दि. 26 रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरूचि निवासस्थानी भेट घेतली व मराठा समाजाची विचारमंथन बैठक पुणे येथे तीन ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, नगरसेवक जयेंद्र चव्हाण, हरिष पाटणे, शरद काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटित लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली व ठोस दिशा मिळेल. मराठा समाजाचे आरक्षण हा राजकारणाचा भाग नाही. मी स्वतः मराठा समाजाचा एक घटक असून या समाजाने आम्हाला मोठे केलेले आहे. त्या-या नियोजन बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने सातार्‍यातील आम्ही सर्वजण वाटचाल करू. राजघराण्याने मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व करावे असे बोलले जातेय, याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेवटी नेतृत्व हे समाजाचे आहे. येथे वैयक्तिक कोणाचाही विषय येत नाही.

मराठा समाज बैठकीत ज्यांच्या कोणावर जबाबदारी देईल किंवा सर्वांच्यावतीने जे काही ठरेल त्यापध्दतीने आम्ही वाटचाल करू. राजघराणे नेहमीच मराठा समाजासोबत आहे. आम्ही कोणाच्या सवलती काढून घेऊन द्या, असे आमचे कोणाचेही म्हणणे नाही. मुळात आरक्षण स्थगित झाल्यानंतर समाजातून तीव्र प्रक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र करून सरकारवर दबाव आणणे व संघटित लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विनायक मेटे आमच्याकडे आले होते. त्यांनी जिल्ह्यातील सर्वांना निमंत्रित केले आहे. मुळात मराठे एकत्र येत नाहीत, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव व वस्तुस्थिती आहे. मराठा समाजातील गरजू लोकांसाठी आपली ताकद एकवटली पाहिजे. त्यामुळे एकत्र येऊन निर्णय केले पाहिजेत. विनाकारण फाटे फोडून चालणार नाही. सर्वांना एकत्र आणण्याठी विनायक मेटे यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. यातून आरक्षणाचा लढ्याला चांगला सुर मिळेल, आंदोलनालाही ठोस दिशा मिळेल, असा विश्‍वास आ. शिवेद्रराजे यांनी व्यक्त केला.
Previous Post Next Post