एसटीच्या वर्कशॉपमध्ये चोरी करताना चोरटा जेरबंद

 

स्थैर्य, सातारा, दि.१४: सातारा एसटी आगाराच्या वकॅशॉपच्या आवारात भंगार चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय कुचेकर, रा. संगमनगर झोपडपट्टी, सातारा असे संशयीताचे नाव आहे. संशयीत हा दि. 14 रोजी दुपारी 3 वाजता सातारा एसटी आगाराच्या वकॅशॉपच्या आवारात अंदाजे 15 किलो वजनाचे भंगारातील अ‍ॅल्युमिनिअमचा पत्रा नेताना आढळून आला. याप्रकरणी कर्मचारी रेश्मा गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादवरून विजय कुचेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार पवार करत आहेत.

Previous Post Next Post