होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी प्रोटीन युक्त आहार घ्या : डॉ. जनार्दन पिसाळ

 

स्थैर्य, फलटण :  सध्या फलटण शहरात व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या मुळे ज्या कोरोना बाधित रुग्णांना कोरोनाचे सिम्टम्स नाहीत अश्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार होम आयसोलेशन मध्ये होत आहेत. त्या मुळे प्रशासनावरील ताण कमी होत आहे. तरी जे कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत, अश्या रुग्णांनी प्रोटीन युक्त आहार घ्यावा. प्रोटीन युक्त आहार घेतल्याने प्रकृती सुधारण्यास मदत होते. त्या मुळे होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्यांनी प्रोटीन युक्त आहार घ्यावा असा वैद्यकीय सल्ला डॉ. जनार्धन पिसाळ यांनी दिला.

कोरोना आपल्याला होऊ नये म्हणून सर्व जण प्रयत्न करीत आहेत. तरी ज्यांना कोरोना हा आजरा होतो परंतु कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. अश्या सर्वानी कोरोनाचे निदान झाल्यानंतर शांत डोके ठवून कोरोनाशी मुकाबला करणे आवश्यक आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यांनतर घाबरून न जाता तातडीने त्या वर उपचार घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. पिसाळ यांनी स्पष्ट केले.

डॉ. पिसाळ पुढे म्हणाले कि, कोरोना बाधित रुग्णांनी आहारात प्रोटीन युक्त आहाराची मात्रा वाढवावी त्या साठी दूध, पनीर, राजमा व डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने करावा. आहारामध्ये भाज्यांचे सूप, डाळीची खिचडी हि घ्यावी. जे रुग्ण मांसाहार करतात त्यांनी अंडी नियमित खावीत. त्या बरोबर बदाम, अक्रोड, काळे मनुके, खजूर, सुखे अंजीर, भाजलेले चणे, भाजलेले शेंगदाणे ई. वापर केला तर कोरोना पासून मुक्त होण्यामध्ये नक्कीच मदत होते. ताजी फळे, व्हिटॅमिन- सी व व्हिटॅमिन-डीची खूप आवश्यकता असते, त्यासाठी व्हिटॅमिन- डी साठी दररोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये २५ ते ३० मिनिटे बसले तर डी-व्हिटॅमिनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. 

त्याचबरोबर मानसिक ताण- तणावापासून दूर राहवे व रुग्णांनी सकारात्मक विचार करून आपले मन हेल्दि ठेवण्यास मदत करावी. या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहिल्याने रुग्ण बरा होण्यास मदत होते. असेही शेवटी डॉ.पिसाळ यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post