टीकास्त्र:'कंगना तो एक बहाना है, बेबी पेंग्विन को बचाना है', नितेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका


स्थैर्य, मुंबई, दि.५: अभिनेत्री कंगना रनोटने मुंबई संदर्भात वक्तव्य केल्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या वादावर भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'कंगना तो एक बहाना है, बेबी पेंग्विन को बचाना है' असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

निलेश राणे ट्विट मध्ये म्हणाले की, "कंगना तर फक्त बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. यापेक्षा जास्त काही नाही." नितेश राणेंच्या या ट्विटनंतर शिवसेना विरुद्ध कंगना पाठोपाठ शिवसेना विरुद्ध राणे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर कंगना नरमली आहे. मुंबईबद्दलच्या आपल्या भावना तिने ट्विट करून व्यक्त केल्या. मुंबईने मला नेहमीच यशोदेसारखे सांभाळले आहे, असे कंगना म्हणाली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.