लोणंदचे ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी साथ प्रतिष्ठाणचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांकडे साकडे

 


स्थैर्य, लोणंद, दि. ०६ : लोणंद व पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य विषयी समस्या निवारण होनेकामी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने दि. १७/०१/२०१३ रोजी शासन निर्णय क्रमांक - संकीर्ण २०१२ /प्र. क्र. १४१/आरोग्य ३ या आदेशाद्वारे ३० बेड/खाटांचे 'ग्रामिण रुग्णालय' लोणंद येथे मंजूर केलेले आहे. 


सदर रुग्णालय उभारणी बाबत अनेक वर्षे दिरंगाई होत असताना वारंवार निवेदने देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने आम्ही जिल्हाधिकारी सो सातारा यांचे कार्यालय समोर आमरण उपोषणास बसलो. नंतर जिल्हा परिषद सातारा मुख्याधिकारी सो. डॉ. शिंदे साहेब व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोई साहेब यांनी भेट देऊन लोणंद येथील जागा पाहणी आदी परिस्थिती स्थळ पाहणी प्रक्रिया बाबत समजवून सांगितले व आश्वासन देऊन उपोषण कर्त्यांची लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठक घेतली.


सद्य उपलब्ध प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असलेले क्षेत्र ५८ आर आहे व हि पुरेशी नसल्याने लगतच मटण मार्केट ची असलेली २० आर जागा रुग्णालय उभारणी साठी देणेबाबत नगरपंचायत यांना सुचना केली याकामी साथ प्रतिष्ठाण वतीने सदर जागा नगरपंचायत यांनी ग्रामीण रुग्णालयास वर्ग करत तसा ठराव मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसणार असलेबाबतचा इशारा देण्यात आला. नगराध्यक्ष सचिन शेळके व उपनगराध्यक्ष किरण पवार तसेच सहकारी नगरसेवक यांनी यावेळी आम्हाला शब्द देत उपोषण पासून परावृत्त केले. 


नगरपंचायत मध्ये मिटींग मध्ये मटण मार्केट पाडुन संबंधित २० आर क्षेत्र देण्याचा सर्वानुमते ठराव करुन तसा ठराव संबंधित अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद सातारा येथे सुद्धा जमीन हस्तांतरण करणे बाबत मंजूरी ठराव संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात आला आहे. अशा पद्धतीने ५८ आर + २० आर = ७८ क्षेत्रावर हे रुग्णालय उभारणी बाबत जमीनीची समस्या निवारण झाली आहे. 


पाठपुरावा सूरु असताना शल्य चिकित्सक कार्यालयातील बाह्य रुग्ण अधिकारी डॉ. पाटील साहेब संबंधित जागेची पाहणी करून गेले. हे रुग्णालय उभारणी बाबत अनेक वर्षांपासून साथ प्रतिष्ठाण वतीने पाठपुरावा सुरू असून या प्रलंबित राहिलेेल्या ग्रामीण रुग्णालय उभारणी बाबत वैयक्तिक रित्या लक्ष घालुन लोणंद नगरितील व पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय द्यावा असे साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांकडे मेलद्वारा निवेदन देऊन साकडे घातले आहे. 


कोविड १९ या बलाढ्य संसर्गजन्य आजाराला नियंत्रित करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणां अहोरात्र परिश्रम घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे.बाधीत रुग्णांना उपचारासाठी बेड व हाॅस्पिटल मिळणे जिकरीचे होत असताना अनेक खासगी रुग्णालये याकामी कार्यान्वित करण्यात येऊन बेड उपलब्ध होत असताना लोणंद शहरातील हे ग्रामीण रुग्णालय आज अस्तित्वात असते तर खुप मोठा आधार प्राप्त झाला असता. याबाबत यासंबंधीत कामकाजची अधिकारी वर्ग यांकडुन माहिती प्राप्त करून रुग्णालय उभारणीसाठी ज्या समस्या आहेत त्यांना निवारण करत सदर ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी चालना देत लवकरात लवकर प्रलंबित ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करावे .अशी कळकळीची विनंती साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी या मेल निवेदनद्वारे व्यक्त केली आहेPrevious Post Next Post