तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द

 स्थैर्य, मुंबई, दि.११: आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. मात्र राज्य सरकारने अवघ्या १५ दिवसात हे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली.

तुकाराम मुंढे यांची २६ ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya