चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीतील दोन टोळ्या जेरबंद

 


सातारा एल.सी.बी.ची कारवाई : 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थैर्य, सातारा, दि. 3 : सातारा शहरात चेन स्नॅचिंग, दागिन्यांना पॉलीशच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी आणि दुचाकी चोरणार्‍या चौघांना एलसीबीच्या पथकाने  दि. 26 ऑगस्टला जेरबंद केले होते. चौकशीदरम्यान संशयीतांनी दोन टोळ्या बनवल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी जानवर शौकत भोसले वय 19 रा. नागठाणे, ता. सातारा व आब्देश यंत्र्या भोसले वय 20 यांची टोळी जबरी चोरी करत होती तर प्रल्हाद रमेश पवार वय 18 केसरकर पेठ सातारा आणि एल अल्पवयीन मुलगा हे दुचाकी चोरून नेत होते. पोलिसांनी संशयीतांकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 


याबाबत माहिती अशी, सातारा शहर व जिल्हयामध्ये एकट्या-दुकट्या फिरणार्‍या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरीच्या घटना काही महिन्यांपासून वाढल्या होत्या. त्यअनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत मार्गदर्शनपर सुचना करून गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जर्‍हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या. त्यानसार पेट्रोलिंग करत असताना दि. 26 रोजी पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जहाड व पथकाने सापळा लावून संशयीत आरोपींना सापळा लावून जेरबंद केले. प्राथमिक चौकशीत त्यांनी चेन स्नॅचिंग व मोटर सायकल चोरीचा गुन्हा कबुल केला. त्यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडे पथकाने पुन्हा कसून चौकशी केली. यावेळी आरोपींनी दोन टोळया तयार करुन एक टोळी चेन स्नॅचिग व एक टोळी मोटर सायकल चोरी करत असल्याची माहिती उघड झाली. अटक आरोपींनी पोलीस कोठडीत त्यांनी इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोर्‍यांच्या गुन्हयात चेन स्नॅचिंग करुन चोरलेले मौल्यवान सोन्याचे दागिने, दुचाकी मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. 

तपासात वर्षापुर्वी वाई तालुकयातील खेडेगावामध्ये महिलांना सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्यातील काही सोने केमिकलचा वापर करुन गाळुन काढुन घेवुन महिलांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने सोने फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली तपास पथकाकडे दिली. त्यास वाई पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. तसेच अटक आरोपींनी तारळे ते सडावाघापासून जाणारे रोडवरील, समर्थगाव व उंब्रज परिसरामधून ऊसतोड व विटभट्टीवर काम करणारे कामगार यांच्या घरामध्ये चोर्‍या करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरी केल्याची कबुली दिली आहे.


ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रसन्न जन्हाड, स.पो.फौ.पृथ्वीराज घोरपडे, जोतीराम बर्गे, पो. हे. कॉ. सुधीर बनकर, प्रविण शिंदे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, विजय कांबळे, पो. ना. मोहन नाचण, शरद बेबले, नितिन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, प्रमोद सावंत, प्रविण कडव , निलेश काटकर, पो. कॉ. विक्रम पिसाळ, विशाल पवार चा. पो. ना. संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत यांनी केली.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.