केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

 

स्थैर्य, दि.१७: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे. गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

'काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,' असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि 
नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.