अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर वडूज पोलिसांची कारवाई

 


आठ जणांच्यावर गुन्हे दाखल; 10 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थैर्य, खटाव, दि. ०२ : खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली ते वरुड रस्त्याच्या कडेलाअसलेल्या तलावांमध्ये आठ ते दहा जण वाळू उपसा करीतअसल्याची गोपनीय माहिती दि 31 रोजी संध्याकाळी साडेनऊ च्यासुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. सपोनि देशमुख यांनी तात्काळ आपली टीम घेऊन खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. त्या ठिकाणी तीन ट्रॅक्टर व आठ इसम अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. यातील दोन ट्रॅक्टर व तीन लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच जण व एक ट्रॅक्टर घेऊन फरार झालेले आहेत. यातील दोन ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू जप्त करून वडूज पोलीस ठाण्यात आणला व संतोष लक्ष्मन मदने,सुनील बसाप्पा देणेकनेबर, शशिकांत निवृत्ती निंबाळकर (सर्व रा. सि. कुरोली ता. खटाव) यांना ताब्यात घेतले आहे तर सुमित पृथ्वीराज देशमुख, विश्वनाथ बसाप्पा वाठारकर, गणेश वसंतपाटोळे, यश दुर्योधन शिरकुळे, गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) हे फरार झाले आहेत. दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व दोन ब्रास वाळू असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. सदर आठ जणांच्यावर भा द वी कलम 379, 34 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस झाले पोलीस प्रशासनाने वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे परंतु महसूल प्रशासन गप्प का आहे? प्रत्येक गावात महसूल प्रशासनाचे दोन कर्मचारी काम करीत असून या कर्मचाऱ्यांना वाळू उपसा होत असल्याची माहिती असून सुद्धा त्यावर महसूल प्रशासनाच्याकर्मचाऱ्यांची कारवाई का होत नाही याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

Previous Post Next Post