पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माण तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न

 

स्थैर्य, दहिवडी, दि.२२: आत्मनिर्भर भारताचे प्रणेते, भारताचे कार्यकर्तृत्वान, पारदर्शक, लोकप्रिय, कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त माण तालुक्यातील वळई येथे आरोग्य शिबीराचे आयोजन मा.आमदार जयकुमार गोरे भाऊ व मा. शिवाजीराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह नेञदान शिबीर तालुका संयोजक दैवत काळेल सर, सुभाष शिंदे , बापू आटपाडकर, संदिप शेंडगे.यांच्या वतीने आयोजित करण्यात आले .

तसेच माण तालुक्यातील जांभुळणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन जवाहर काळेल यांनी केले होते.

... यावेळी , डाॅ. आनंदाराव खरात,सुभाष विरकर,रत्नप्रभाकर शेट्टी ,दादा आटपाडकर सर ,केराप्पा काळेल सर,बबन गोरवे सर, रेवणसिद्ध काळेल,भारत काळेल,दिपक काळेल,बंडु काळेल व इतर अनेक मान्यवंराच्या उपस्थित होते..यावेळी डाॅ. लता बाबार मॅडम व डाॅ.रविद्र बाबर सरांनी आरोग्य तपासणी व्यवस्थित केली.....यावेळी वळई ग्रामस्थांना काडा व गोळ्या वाटप करण्यात आले...सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन , सोशल अतंर ठेवून कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडला...१०० च्या आसपास लोकांनी शिबीराचा लाभ घेतला..तर जांभुळणी येथील अनेक युवकांनी रक्तदान शिबीरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.