सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विनय गौडा; मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची तडकाफडकी बदली

 

स्थैर्य, सातारा, दि.२४: कोरोनावरून जिल्हा परिषदेच्या सभेत आरोग्य विभाग व जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे ओढले जात असताना अचानक दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या बदलीचा आदेश मिळाला.त्यांना सभेतच निरोप देण्यात आला.दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाला लगाम लावण्यासाठी त्यांनी चार कोरोनासाठी हॉस्पिटल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहेत.

सातारा जिल्हा परिषदेची स्थायी आणि जलसंधारणच्या ऑन लाईन सभा सुरू होत्या.दोन्ही सभेत पदाधिकारी यांनी कोरोनावर चर्चा करून प्रशासनाचे वाभाडे सुरू होते.त्याच दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या बदलीचा आदेश मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.त्यांच्या जागी नव्याने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे आले आहेत.विनय गौडा हे 2015 चे आयएएस अधिकारी आहेत.नंदुरबार येथेच आदिवासी कल्याणचे उपजिल्हाधिकारी होते.त्या दरम्यान, एका घटनेवेळी ते घटनास्थळी भेट द्यायला तळोदा येथे गेले होते त्यावेळी संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता.महसूल विभागाने तीन दिवस काम बंद केले होते.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संरक्षण दिले होते. तसेच त्यांची बदली नंदुरबार जिल्हा परिषदेत झाली.मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेताच त्यांनी तरुण तडफदार म्हणून जलयुक्त शिवारचे प्रभावी काम जिल्ह्यात राबवण्यात आले.दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून प्रयत्न केले.तर कोरोनाच्या काळात कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार हॉस्पिटल सुरू केले.स्वतः ऑन फिल्ड उतरून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा हे काम करत होते.सातारा जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारताच त्यांना कोरोनाला लगाम लावण्यासाठी ऍक्शन मोडवर काम करावे लागणार आहे.त्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही.त्यांचे जिल्ह्यात स्वागत होत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya