विंचूर्णी गावचे कोरोना विरुद्ध युद्ध...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पनेतून साकारलेला फिरता दवाखाना उपक्रमांतर्गत पेशंट तपासणी करताना डॉ.धनश्री शिराळकर, विंचुर्णी गावाला पशुवैद्यकीय सेवा देताना माजी पशुप्रांत डॉ.श्रीकांत मोहिते व सरपंच लायन रणजीतभाऊ निंबाळकर.


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील फलटण शहरापासून 8 कि.मी. दक्षिणेकडे असणारे एक लहानसे विंचूर्णी हे गाव.गावाची लोकसंख्या 1 हजारच्या आतच असून मुख्य गावठाण व चहुबाजूला असणार्‍या 6 वाडीवस्त्या. गेली 5 वर्षे गावाची धुरा सांभाळणारे प्रथम नागरिक श्री.रणजितभाऊ निंबाळकर हे राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले व लाभत आहे. 

मागील पाच वर्षात गावात अनेक विकासाची कामे ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेवून केलेली आहेत. सर्वात महत्त्वाचे पाच वर्षात गावाला कधीही पाणी टंचाई भासू दिली नाही. ज्या-ज्या वेळी कॅनॉलला धोम बलकवडीच्या पाण्याची पाळी सुटायची त्यात्या वेळी ना.श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्याकडे पाठपुरावा करुन हे पाणी नऊ वेळा विंचूर्णीच्या तलावात सोडण्यासाठी ग्रामस्थांना बरोबर घेऊन अथक प्रयत्न केले व त्यांना त्यात यश मिळाले. तसेच फलटण - विंचूर्णीचा रस्ता जो अनेक वर्षे प्रलंबित असलेला विषय, तो सुद्धा ना.श्रीमंत रामराजेंच्या अथक प्रयत्नाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून’ 5.05 कि.मी. दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी प्रशासकीय मान्यता मिळवून सदर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. 

तसेच संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोविड 19 या कोरोना विषाणूचे संसर्गामुळे प्रसार होत असलेल्या रोगाचा फटका विंचूर्णी गावालासुद्धा बसला. ग्रामस्थांना सोशलमिडीया मार्फत कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगणे संदर्भात सरपंचांनी सर्वांना वैयक्तीक व ग्रुपवर अनेक वेळा मेसेजेस दिले व देत आहेत. तसेच संपूर्ण गावात व सर्व वाड्यावस्त्यांवर चार वेळा जंतुनाशक, दोन वेळा सोडियम हायपोक्लोराईट व दोन वेळा कॅलशियम हायड्रोक्लोराईडची फवारणी ट्रॅक्टरने घेण्यात आली. लॉकडाऊनचे काळात विंचुर्णी गावात एकूण पाच लग्न कार्य पार पाडली व सर्व कार्यामध्ये प्रशासनाची परवानगी घेऊन व त्यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार सर्वच्या सर्व शुभकार्य यशस्वी पार पाडली. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत अर्सेनिक अल्बम - 30 च्या गोळ्या घरपोच देण्यात आल्या. 

एवढी दक्षता घेऊनसुद्धा दिनांक 11 जुलै 2020 रोजी गावातील एक ग्रामस्थ कोवीड - 19 या साक्षाच्या रोगाला बळी पडला व त्याचा रिपोर्ट दि.12 जुलै रोजी पॉझीटीव्ह आला व दि.13 जुलै रोजी सदर ग्रामस्थांचे अती निकटवर्तीय व्यक्ती म्हणजे त्यांचे कुटूंबातील 13 जणांना फलटण येथील शेती शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात हालविण्यात आले व त्यांचे स्वॅब घेवून त्यापैकी 12 जण पॉजीटीव्ह निघाल्यानंतर त्यांना 15 दिवस शेती शाळेतच ठेवण्यात आले होते. 

दि.28 जुलै रोजी सदर कुटुंबातील सर्व व्यक्तींची पूर्ण आरोग्य तपासणी करुन त्यांना घरी पाठवण्यात आले व ते विंचूर्णीला येताच त्यांचे स्वागत सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी गुलाब पुष्प देवून स्वागत केले. तसेच सदर कुटूंबातील 14 व्यक्तींना कमिन्स इंडिया कंपनीच्या सहकार्याने मास्क व सॅनीटायझर देण्यात आले. तसेच पोलीस पाटील, होमगाड, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षीका यांना सुद्धा मास्क व सॅनेटायझर ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आले व या कोवीड 19 चे युद्धात त्यांनी ग्रामसेवक, तलाठी व गावातील तरुण ग्रामस्थांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली व त्यांचा सत्कार व कौतुक सरपंच रणजीत निंबाळकर यांनी अनेक वेळा केला व करत आहेत. 

- डॉ.श्रीकांत कृष्णराव मोहिते,

माजी पशुप्रांत, ओंकार गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण. 

मो.9403940761

Previous Post Next Post