महिलेला अश्‍लील मेसेज पाठवणार्‍या युवकास वाठार पोलिसांनी केल जेरबंद

 


दुसर्‍याच्या नावाचे सीमकार्ड वापरून महिलेची छेडछाड करण्याचा प्रकार 


स्थैर्य, पिंपोडे, दि. १३ : महिलेला मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवरून अश्‍लील मेसेज पाठवणार्‍या युवकास वाठार पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 


वाठार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील शेखर किसन साळुंखे (वय 29) याने गेली सहा महिने एका पीडित महिलेस दुसर्‍याच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून वारंवार अश्‍लील मेसेज पाठवून छेडछाड करीत होता. त्याच्या या छेडछाडीला वैतागून सदर महिलेने दि. 28 ऑगस्ट रोजी वाठार पोलिसांत जाऊन अज्ञात व्हॉट्सअ‍ॅप नंबर तसेच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. 


वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, बोडके तसेच पोलीस कर्मचार्‍यांनी सदर घटनेचा तपास तातडीने करून आरोपीस अटक केले. 


सदरच्या अटक केलेल्या आरोपीकडूूूून वेगवेगळ्या कंपनीचे तीन सीमकार्ड हस्तगत केले. पोलिसांनी हस्तगत केलेले सीमकार्ड दुसर्‍याच्या नावावर होते. सदर आरोपी अश्‍लील मेसेज दुसर्‍याच्या नावावर असलेल्या सीमकार्ड वरूनकरीत होता. परंतु, वाठार पोलिसांनी सदर आरोपीच्या मुसक्या तातडीने आवळल्या आहेत. 354 कलम अन्वये कारवाई करून आरोपीस कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आले आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.