वडूज मधील कोरोना बधितांचे रिपोर्ट कधी मिळणार-नागरिकांचे तहसीलदाराना निवेदन

 


स्थैर्य, खटाव, दि. १२ (विनोद खाडे) : गेले सहा महिने कोरोना विषाणू ने थैमान घातले असून मागील मे व जून महिन्यात वडूज येथील काही प्रभागातील अनेक जणांचे कोरोना बाधित रिपोर्ट आले होते, त्या रुग्णांमध्ये काहीना नोकरी साठी तर काही ना विमा संरक्षण,मेडिक्लेम याचा लाभ घेण्यासाठी हे रिपोर्ट लागणार आहेत. मात्र अनेक वेळा संबंधित खात्याला मागणी करून सुद्धा हे रिपोर्ट मिळत नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत.तरी प्रशासनाने या व्यक्तीचे मे व जून महिन्यातील रिपोर्ट त्वरित द्यावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी तालुका अध्यक्ष शबाना मुल्ला,जावेद मुल्ला आदींच्या वतीने तहसील कार्यालयात अधिकारी विलास जाधव यांना देण्यात आले. आयुब मुल्ला, मन्सूर मुल्ला, नूर मुहंमद मुल्ला, अस्लम मुल्ला, आरिफ मुल्ला, कैय्युम मुल्ला, जैनुद्दीन मुल्ला, रेश्मा मुल्ला, फरजाना मुल्ला, नगिना मुल्ला, इरफान मुल्ला, सादिक मुल्ला आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya