बाधित, होम आयसोयलेशन व क्वारंटाईनअसणार्‍यांसाठी योग, प्राणायाम व ध्यान शिबिर

 

स्थैर्य, सातारा, दि.१४: जे लोक कोरोना पॉझिटिव्ह, होम कॉरंटाइन, होम आयसोलेशन आहेत त्यांच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने शिबीर मोफत घेण्यात येत आहे. यामध्ये योगा, प्राणायाम व ध्यान घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. 

योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारेल, प्राणायामामुळे फुप्फुसाची क्षमता वाढून ऑक्सिजनची मात्रा वाढण्यास मदत होईल व ध्यानामुळे मनाची स्थिरता टिकून सकारात्मकता वाढण्यास मदत होईल आज ही काळाची गरज आहे. शिबीर घरात बसून ऑनलाइन पद्धतीने मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर याद्वारे करता येणार आहे. हे शिबिर कालावधी 18 ते 23 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 5 ते 6 या दोन बॅचमध्ये होणार आहे. अधिक माहितीसाठी 9270170582 या नंबरवर संपर्क करायचा असून नावनोंदणी 9421212637, 9763041718, 9422606540, 9270170582 येथे करायची आहे. यानंतर संबंधितांना ऑनलाइन जॉईन होण्यासाठीची लिंक दिली देण्यात येणार आहे. या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने अर्जुन भोसले यांनी केलेले आहे.
Previous Post Next Post